Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास खूप मोठा आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे अतिशय लोकप्रिय आहेत. या ठिकाणांना भेट देण्यासाठी दूरवरून लोक येतात. पण पुण्याजवळील काही ठिकाणे अशी आहेत, ज्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आपण अशाच एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. पुण्यापासून फक्त ४० किमी अंतरावर हे सुंदर मंदिर आहे. बनेश्वर नावाने हे मंदिर ओळखले जाते. श्री बनेश्वर हे एक पुरातन शिवमंदिर, जे निसर्गाच्या सान्निध्यात वसले आहे. हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
पुण्यापासून फक्त ४० किमीवर असलेले हे सुंदर निसर्गरम्य बनेश्वर मंदिर पाहिले का?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल. या मंदिराच्या परिसरात सुंदर तलाव आहे. मंदिराच्या अवतीभोवती सुंदर निसर्ग आहे. हिरवी झाडेझुडपे आहे. त्यामुळे या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते. हे सुंदर बनेश्वर मंदिर डोंगरावर वसलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची आणखी गर्दी दिसून येते. प्राचीन वास्तू आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम असलेले बनेश्वर मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ठिकाण नेमके आहे तरी कुठे? तर हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात नसरापूर परिसरात वसलेले आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
traveller_aaba या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बनेश्वर,नसरापूर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “कुठे आहे मंदिर हे गाव तालुका जिल्हा कळेल का” तर एका युजरने लिहिलेय, “बनेश्वर हर हर महादेव” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुंदर मंदिर” अनेक युजर्सना हे मंदिर खूप आवडले. त्यांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा पुण्याजवळील असे अनेक ठिकाणांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर अशा व्हिडीओवर नेटकरी खूप चांगला प्रतिसाद देतात.