Puneri pati: पुणे म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे प्रसिद्ध ‘पुणेरी पाट्या’. या पाट्या अनेकदा त्यांच्या हटके आणि तिरकस शैलीसाठी चर्चेचा विषय ठरतात. कधी सामाजिक भाष्य, कधी विनोद, तर कधी सरळसोट सूचना. अशा वेगवेगळ्या स्वरूपात पुणेरी पाट्या नेहमीच लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा अशीच एक भन्नाट पाटीची चर्चा रंगली आहे. पुणं तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुणेकर नागरिक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस सभावामुळे चारचौघात उठून दिसतो. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. आता हेच पाहा ना, एका पुणेरी पाटीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना असा टोला लगावला आहे की वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.गाडी नो पार्किंगमध्ये लागली, की ती ‘टो’ होण्याची भीती असतेच. पण आपल्याकडे अनेकजण या भीतीच्या पलिकडे गेले आहेत. वारंवार सांगूनही बेशिस्तपणे गाड्या पार्क करण्याचे प्रताप आपल्या आजूबाजूला होताना सहज दिसतील. त्यासाठी फार शोधाशोध करण्याची गरज नाही. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना आवरण्यासाठी काहीतरी करायला तर हवं! फक्त गाडी ‘टो’ करुन, दंडांच्या पावत्या फाडून बेशिस्त पार्किग करणारे ताळावर येण्याची शक्यता कधीचीच संपुष्टात आली आहे. अशावेळी काहीतरी नवं करण्याची गरज आहे. हेच या पुणेकरांनी केलं.
आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय तरी काय या पाटीवर? तर या पाटीवर थेट गेटसमोर गाडी उभी करणाऱ्यांना धमकीच दिलीय. “गेटसमोर गाडी लावल्यास सर्विसिंग करुन बिल देण्यात येईल…हवा वगैरे आम्ही सोडत नाही” आता तुम्हीच सांगा एवढा अपमान आणि धमकी दिल्यानंतर कोणी इथे गाडी पार्क करायाचा विचारही करणार नाही.
पाहा पुणेरी पाटी
हा फोटो सोशल मीडियावर Omkar Chirme नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अशा अनेक पुणेरी पाट्या रोज व्हायरल होत असतात.