Video viral: सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.असे अनेक धाडसी लोक आहेत जे सापांना घाबरत नाहीत. ते या सापांसोबत इतके फ्रेंडली होतात, की त्यांना साप चावल्यानंतरही ते न घाबरता अगदी सामान्यपणे वागतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण अजगरासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता यावेळी सापानं त्याच्यावर हल्ला केलाय. अजगर पटकन हल्ला करत तरुणाचं टी-शर्ट पकडतो. ज्यामुळे तिथे चेंगराचेंगरी होते. सुदैवाने, तो तरुण सापाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओचा कमेंट सेक्शन वापरकर्त्यांच्या मजेदार कमेंट्सनी भरलेला आहे. तर काही वापरकर्त्यांनी तरुणांमध्ये सोशल मीडियाची धोकादायक क्रेझ देखील अधोरेखित केली आहे.खरंतर, आजकाल तरुणांना सेल्फी काढणे आणि व्हिडिओ बनवणे खूप आवडते. मात्र यावेळी ते आपला जीव धोक्यात घालत असतात.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

schooloflegends__ नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सर्पदंशाने काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सापांसोबत खेळ करणं काही जणांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. विषारी सापांसोबत रील बनवताना काही तरुणांचा दंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असतानाही काही तरुण सापांसोबत खेळ करण्याचा नाद सोडत नाहीत