राणीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे, कारण राणी एलिझाबेथने  एलिझाबेथची भेट घेतली आहे. आता एलिझाबेथ म्हणजे इथल्या पुर्नवसन केंद्रात जन्माला आलेलं हत्तीचं पिल्लू बर का! राणीने नुकतीच या पुर्नवसन केंद्राची भेट दिली आणि इथे असलेल्या हत्तीच्या पिल्लासोबत  थोडा वेळही घालवला, विशेष म्हणजे या पिल्लाचे नाव आपल्या नावावरून ठेवले गेले असल्याचे राणीला कळंल तेव्हा मात्र त्यांना आश्चर्यही वाटलं आणि कौतुकही.

ब्रिटनची ही राणी गेल्याच वर्षी नव्वद वर्षांची झाली. त्यामुळे राणीच्या वाढदिवसाचा मोठा सोहळा इंग्लडमध्ये साजरा करण्यात आला होता. काही महिने आधिपासूनच या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु होती. तर पुढचे काही दिवस हा सोहळा सुरू होता. राणीच्या ९० व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी या पिल्लाचा जन्म झाला म्हणून तिचे नाव एलिझाबेथ ठेवण्यात  आले. लंडनच्या झूलॉजिकल सोसाटीच्या प्रमुख राणी आहेत. येथे नऊ आशियायी हत्तीचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्रात हत्तींची कशी देखलभाल घेतली जाते याची उत्सुकता राणींना होती. म्हणूनच त्यांनी या केंद्राची भेट घेतली.

वाचा : राणीच्या महालात “फूटवुमन’ची नोकरी, सँडल घालून मिरवण्याचे मिळतात पैसे

वाचा : यासाठी राणीच्या हातात नेहमी पर्स असतेच