रेल्वेचा प्रवास म्हणजे एकदम स्वस्तात मस्त आणि तुलनेने अधिक आरामदायी मानला जातो. त्यामुळे अधिकतर लोक ट्रेनमधून प्रवास करणं पसंत करतात. विशेष म्हणजे जनरल डब्यामध्ये अधिक गर्दी पाहायला मिळते. कारण- त्यामध्ये अचानक गावी जाणारे अधिक जण असतात. ट्रेननं प्रवास करताना सावध राहा, दरवाजावर उभं राहू नका, छतावर चढू नका, खिडकीबाहेर हात काढू नका, ट्रॅक ओलांडू नका, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. कारण- ट्रेनचा वेग प्रचंड असतो. तरीही लोक सूचनांचे पालन करताना दिसत नाहीत. आता असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यामध्ये रेल्वे प्रवासी रेल्वेमध्ये बसायला जागा न मिळाल्याने रेल्वेच्या छतावर चढून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

बांगलादेशातील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. वास्तविक या व्हिडीओमध्ये बांगलादेशातील एका रेल्वेस्थानकावर प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि काही रेल्वे पोलीस अधिकारी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. ही रेल्वे प्रवाशांनी भगरच्च भरलेली आहे. तरीही प्रवासी येथे चढण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही प्रवासी जागा न मिळाल्याने रेल्वेच्या छतावर चढत आहेत. प्रवासी अशा कृत्यामुळे त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत हे त्यांना कळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना तसे जीवघेणे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी पोलिस त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पोलिसांचे नेटकरी कौतुक करीत आहेत.

(हे ही वाचा : ‘शिकार करो या शिकार बनो’ ५० माकडांनी केला बिबट्याचा मोठा गेम; असं काय केलं? VIDEO चा शेवट नक्की पाहा )

मात्र, असा व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करणारी एक महिला आणि ‘सबवे सर्फर्स’ या मोबाईल गेममध्ये स्टंट करणाऱ्या पुरुषाच्या क्लिपही इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत.

हा व्हिडीओ ९ एप्रिल रोजी @amarbanglaremati या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केला गेला होता; ज्याचे श्रेय ‘जमुना टीव्ही’ला देण्यात आले होते. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘ईदच्या सुट्यांमुळे तिकिटं मोठ्या प्रमाणात संपली आणि जागा न मिळाल्यानं अनेक लोक ट्रेनमध्ये चढले. काही लोकांकडे पैसे नसल्यामुळे किंवा त्यांना तिकिटं घ्यायची नसल्यामुळे काहींनी तिकिटं घेतली नाहीत,” अशीही नोंद झाली.

येथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by amarbanglarmati (@amarbanglaremati)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्दैवाने एवढी गर्दी हाताळणे रेल्वे अधिकाऱ्यांना फार अवघड होते. व्हिडीओला प्रतिसाद देताना एका युजरने म्हटले, “बांगलादेशमध्ये हे सामान्य आहे.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “बांगलादेश नवशिक्यांसाठी नाही.” आणि तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “कदाचित हे लोक भारतात निवडणूक लढवायला येत आहेत.” तसेच युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. बरं, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये सांगा.