Five Men Fell In The Sewer Video: आय़ुष्यात कधी काय घडेल, याचा काही नेम नाही. कोणासोबत कधी काय होईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. तुम्ही अनेकदा हे ऐकलं असेल, की ‘वाईट वेळ कधीही येऊ शकते.’ नेमकी अशीच एक घटना सध्या घडली आहे. चार मित्र पंक्चरच्या दुकानात उभ्या उभ्या गप्पा मारत होते आणि अचानक त्यांच्या पायाखालची जमीनच फाटते आणि ते सगळेचजण जमिनीत सामावून जातात. त्यांच्यासोबत बाजुला बसलेला पंक्चर दुकानात काम करणारा एक व्यक्ती सुद्धा जमिनीत सामावून जातो. हा व्हिडीओ खरं तर अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ पाहताना सुरूवातीला मनात धडकी भरू लागते. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राजस्थानमधल्या जैसलेमरमधला आहे. बाबा बावडी परिसरात पावसाळी नाल्यावर असलेल्या एका पंक्चरच्या दुकानात कडेला उभं राहून पाचही मित्र एकमेकांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होते. बाजुला एक मेकॅनिक दुचाकी दुरुस्त करत असताना दिसून येत आहे. जैसलमेर रेल्वे स्थानकासमोर बाबा बावडीजवळच्या मुख्य रस्त्यावरच हे टायर पंक्चरचे दुकान आहे. दुकानासमोर पावसाळी नाला असून त्यावर दगडी पट्टे आहेत. नाल्याला झाकलेल्या या दगडी पट्ट्यांवर हे चार जण गप्पा मारत उभे होते,.हा नाला सध्या कोरडा पडला होता. पण आपल्या डोक्यावर मृत्यू घोंगावतोय याची या चार जणांना कल्पना सुद्धा नव्हती. काही सेकंदात नशीबात काय लिहिलंय हे त्यांना माहित नव्हते. गप्पा मारता मारता हे चारही जणांच्या पायाखालच्या दगडी पट्ट्या नाल्यात बुडल्या आणि सोबत हे चार मित्र नाल्यात पडले. त्यांच्यासोबत बाजुला दुचाकी दुरूस्त करत असलेला एक मॅकेनिक सुद्धा त्यांच्यासोबत नाल्यात पडला.

आणखी वाचा : प्राण जाए पर फोन ना जाए! अंगावरून ट्रेन गेली पण गॉसिप काही बंद झालं नाही, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रेल्वे स्टेशनवर या मुलाने अशी जबरदस्त उडी घेतली अन्…., पाहा हा VIRAL VIDEO

सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. पाचही जण नाल्यात पडल्यानंतर ते स्वतःच एक एक करून नाल्याबाहेर पडले. यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र ही घटना रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागलाय. ही घटना ७ एप्रिल रोजी घडली असल्याचं सांगण्यात येतंय. हा नाला कोरडा होता म्हणून हे पाचही जण बचावले. जर या नाल्यात पाणी वाहत असलं असतं तर त्यांचा मृत्यू अटळ होता. त्यामूळे या घटनेनंतर लोक प्रशासनाने केलेल्या नाल्याच्या कामावर प्रश्चचिन्ह उपस्थित करताना दिसून येत आहेत.