घरात जन्माला आलेल्या नवजात बालकाचं नाव काय ठेवायचं असा प्रश्न नेहमीच घराच्यांपुढे असतो. तेव्हा अनेक जणांचे सल्ले घेऊन झाल्यानंतर बारसं वगैरे करून मुलांचं नामकरण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यातून मुलांना आजी आजोबांचं किंवा पूर्वजांचं नावं ठेवणं, एखाद्या अभिनेता अभिनेत्र्यांची नावं ठेवण्याची पद्धत आहे. पण राजस्थानमधल्या एका आईनं मात्र मागचा पुढचा विचार न करता आपल्या नवजात बालकाचं नाव चक्क ‘जीएसटी’ ठेवलं आहे.
VIDEO : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून CNNची धुलाई
३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांनी या मुलाचा जन्म झाला म्हणूनच त्याच्या आईने या मुलाचं नाव जीएसटी ठेवलं आहे. राजस्थानमधल्या बिवा गावात या मुलाचा जन्म झाला. १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली, जीएसटी म्हणजे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने टाकलेले नवे पाऊल आहे अशा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय तेव्हा अशा ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्यानं आपण त्याचं नाव जीएसटी ठेवल्याचं त्याच्या आईने सांगितले. भाजपाचे प्रवक्ते नलीन कोहिली यांनी या बाळाचा फोटो शेअर केलाय. छोट्या जीएसटीला हातात घेऊन त्यांच्या आईने सेल्फी काढालाय आणि याचा फोटो कोहिली यांनी शेअर करत बाळाला शुभेच्छा दिल्यात. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील या बाळाला भरभरून शुभेच्छा दिल्यात.
वाचा : इस्त्रायल दौऱ्यात ‘या’ तरूणीला मिळणार मोदींच्या स्वागताचा मान