Raksha Bandhan 2023 Wishes in Marathi: भाऊ- बहिणीचा हक्काचा सण अशी ओळख असणारा रक्षाबंधनाचा सोहळा यंदा अधिक श्रावणामुळे पुढे ढकलला गेला होता. पण आता उशिराने का होईना ३० ऑगस्टला भारतात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होणार आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन पार पडते. अलीकडे कोणताही सण हा सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही, तुम्हीही उद्या तुमच्या लाडक्या लहान- मोठ्या बहिणीबरोबर/ भावासह फोटो शेअर कराल. त्याच्या जोडीनेच तुमच्या भावंडांना गिफ्टची आणि तुमच्यातील लहान सहान खोड्यांची आठवण करून देण्यासाठी काही खास शुभेच्छापत्र आज आम्ही घेऊन आलो आहोत.

तुम्ही तुमच्या Whatsapp Status, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करू शकता. यासाठी खास मराठमोळ्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छांचे ग्रीटिंग्स, GIF, HD Images, शेअर करताना शोधाशोध करावी लागू नये म्हणून आजच खालील शुभेच्छापत्रे फ्री डाउनलोड करून ठेवा.

रक्षाबंधनाच्या मराठी मजेशीर शुभेच्छा ग्रीटिंग

तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे..
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan 2023 Marathi wishes for Brother and Sister WhatsApp Status Instagram HD Images Funny GIFs Happy Siblings

लहान भावाच्या रक्षणासाठी उभ्या
प्रत्येक मोठ्या बहिणीला सुद्धा
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Raksha Bandhan 2023 Marathi wishes for Brother and Sister WhatsApp Status Instagram HD Images Funny GIFs Happy Siblings

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Raksha Bandhan 2023 Marathi wishes for Brother and Sister WhatsApp Status Instagram HD Images Funny GIFs Happy Siblings

चल गिफ्ट नको.. पण मी सांगेन तेव्हा-तेव्हा
एक ग्लास पाणी आणून देशील ना..
Happy Rakhi डिअर भावा!

Raksha Bandhan 2023 Marathi wishes for Brother and Sister WhatsApp Status Instagram HD Images Funny GIFs Happy Siblings

चिडून, भांडून, रागावून सुद्धा
ज्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही
असं नातं म्हणजे भावा- बहिणीचं
तुम्हा सर्वांना सुद्धा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Raksha Bandhan 2023 Marathi wishes for Brother and Sister WhatsApp Status Instagram HD Images Funny GIFs Happy Siblings

तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या लोकसत्ता परिवाराकडूनही खूप खूप शुभेच्छा!