Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातूनही असे अनेक व्हिडीओ हे आपल्याला इमोशनलही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही इमोशनल व्हाल. बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात काळजी, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर कितीही भांडत असले तरी ते क्षणभरही एकमेकांशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर बहीण भावाचे कधी मस्ती करतानाचे तर कधी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. चिमुकल्या बहीण भावाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी एका मुलाची आई डिलीव्हरीसाठी आतमध्ये गेलेली असताना या चिमुकल्यानं बहिणच होणार असं म्हणत आधीच राखी आणून ठेवली. यानंतर आता तुम्हीच पाहा की या चिमुकल्याच्या आईला मुलगी झाली की मुलगा?

सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असेल, तर ते भाऊ- बहिणीचं! ते दोघे एकमेकांशी भांड भांड भांडतील; पण त्या दोघांतल्या प्रेमाला कधीच ओहोटी लागत नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही; पण त्या दोघांच्याही मनात सातत्याने एकमेकांबद्दल मायेचा ओलावा पाझरत असतो. लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी असते ते मोठा भाऊ बनून लहान बहिणीला सांभाळणे. ज्यांना लहान बहीण असते त्यांना इतर कोणत्या मैत्रिणीचीही गरज भासत नाही. दरम्यान एका चिमुकल्याला त्याची बहिण जगात येण्याआधीच कळलं होतं की त्याची बहीण येतेय. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर झालं असं की, एका चिमुकल्याची आई डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली आणि बाळ होण्याआधीच या चिमुकल्यानं हॉस्पिटलमध्ये राखी आणत रक्षाबंधनाची तयारी केली. यावेळी आनंदाची बाब म्हणजे काहीच वेळात डॉक्टर बाळाला घेऊन येतात आणि तुम्हालाही आता प्रश्न पडला असले की मुलगा झाला की मुलगी?? तर या चिमुकल्याची इच्छा पूर्ण झाली असून मुलगीच झाली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डॉक्टर बाळाला घेऊन येतात आणि चिमुकल्याच्या हातात देतात आणि म्हणतात, तू दादा झाला. यावेळी चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्वकाही सांगून जातोय.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ radhagovindhospital416416 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.