Ram Mandir Pran Pratishtha Live Telecast: अयोध्‍येमध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदि रप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी ८००० पेक्षा जास्त पाहुण्यांना आमंत्रिक केले होतो. विशेष म्हणजे या खास दिवशी पूर्ण अयोध्या शहर भव्य स्वरुपामध्ये सजवले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काय होणार, कोणते पाहूणे येणार आहेत, पूजा कशी होणार, मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत याची उत्सुकता सर्वांना आहे. अशा परिस्थितीत, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा प्रत्येक सेकंद तुम्ही घरी बसून कसा पाहू शकता. होय. तुम्ही अयोध्येला जाणार नसेल तरीही घरबसल्या तुम्ही प्रभु रामाचे दर्शन घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या…

tuljabhavani festival marathi news
घटस्थापनेने उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव; रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने तुळजाभवानी देवी मंदिराला झळाळी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Daily Horoscope 28th September 2024 Rashibhavishya in Marathi
२८ सप्टेंबर पंचांग: इंदिरा एकादशीला मेषची इच्छा पूर्ती तर व्यापारी वर्गाची चांदी; तुमच्या कुंडलीत पडणार का धन-सुखाचा पाऊस? वाचा राशिभविष्य
What is The Meaning of Prasad Word?
Prasad : तिरुपती मंदिरातील लाडू भेसळीमुळे चर्चेत! ‘प्रसाद’ म्हणजे नेमकं काय?
Siddhivinayak Temple
Siddhivinayak Temple : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदरांची पिल्ले? व्हायरल VIDEO वर मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण काय?
animal meet tirupati laddu marathi news
तिरुपतीमधील लाडू वाद चिघळला
next 190 days Shani will give money These four zodiac signs
पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
Tirumala Tirupati Prasad Ladoo
Tirupati Balaji Prasad Ladoo : तिरुपती बालाजीच्या प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? ‘पोटू’ नेमकं काय आहे?

Doordarshan वर होणार थेट प्रक्षेपण
केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पीआयबीच्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये देशभरातील लोकांपर्यंत पोहण्यासाठी दुरदर्शनद्वारे खास व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी दुरदर्शन अयोध्येत राम मंदीर आणि आसपास ४० कॅमेऱ्या लावणार आहे आणि ४के( 4K) डिस्प्लेवर थेट प्रसारण केले जाणार आहे. डीडी नॅशनल आणि डीडी न्युजवर याचे थेट प्रसारण होणार आहे.

हेही वाचा – राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण घेऊन घरोघरी पोहचले राम भक्त! जाणून घ्या आमंत्रण पत्रिकेमध्ये काय लिहिले आहे?

हेही वाचा – सिनेमा हॉलमध्ये चक्क लॅपटॉपवर काम करतेय ‘ही’ व्यक्ती; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले ,”शोऑफ…”

युट्यब आणि इतर सोशल मीडिया अकांउटवर होईल थेट प्रसारण
फक्त २२ जानेवारीलाच नाही तर २३ जानेवारीला दुरदर्शनवर प्रभु रामााची विशेष आरतीचे आणि मंदिराचे उद्घाटनही थेट प्रक्षेपण केले जाईल. मुख्य मंदिर परिसराव्यतिरिक्त, दूरदर्शन आपल्या विविध चॅनेलवर शरयू नदीच्या घाटाजवळील राम की पायडी, कुबेर टिळा येथील जटायू पुतळा आणि इतर ठिकाणी थेट प्रक्षेपण करेल.

पीआयबीच्या म्हणण्यानुसार, “भारताव्यतिरिक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचे प्रसारण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक तयार केली जात आहे. हे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील प्रसारित केले जाईल. मात्र, सध्या याबाबतची सविस्तर माहिती शेअर केलेली नाही. याशिवाय, कार्यक्रमाची छायाचित्रेही पीआयबीकडून राज्यांतील इंग्रजी, हिंदी आणि भारतीय भाषांमध्ये शेअर केली जातील.”

हेही वाचा – अभ्यास न करता SSC JE परीक्षेत कसे पास व्हावे? आळशी विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने सांगितली भन्नाट ट्रिक; Video Viral

टीव्ही चॅनेल्सना फीड दिले जाईल
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की,”दूरदर्शन व्यतिरिक्त खाजगी वाहिन्यांनाही दूरदर्शनद्वारे फीड मिळेल.” त्यांनी सांगितले की,”जी२० (G20) प्रमाणेच यावेळीही दूरदर्शन ४के (4K) मध्ये प्रसारित करेल. संपूर्ण कव्हरेज थेट आणि विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या चॅनेलवर प्रसारित केले जाईल. चंद्रा म्हणाले की, “४के (4K) तंत्रज्ञानाद्वारे अतिशय स्पष्ट आणि चांगले थेट प्रक्षेपण केले जाते, ज्यामुळे उच्च दर्जाचे चित्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.”

८००० पाहुण्यांना आमंत्रण
अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येणार आहेत. मोठ्या उत्सवापूर्वी उत्तर प्रदेश सरकार आणि अयोध्या प्रशासनाने सर्व तयारी केली असून मोठ्या दिवसासाठी शहर सजवले जात आहे. श्री राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले की, “८००० लोकांना आमंत्रित केले असले तरी किमान १० ते १५ हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जात आहे.