Navy Officers Mess Viral Photo: दारूचे चाहते किती आहेत हे मोजायला बसलं तर वर्ष जातील. काही जण दारू पितात पण ते काही अगदी बेवडे या वर्गात येत नाहीत. अनेकजण प्रासंगिक ड्रिंकर किंवा सोशल ड्रिंकर असतात. याचा अर्थ असा की खास प्रसंगी मित्रांसह गप्पांमध्ये ही मंडळी एखादा दुसरा पेग घेतात.याचे आरोग्यावर दुष्परिणाम माहित असल्यास दारू प्यायची की नाही हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दारूप्रेमींची संख्या पाहता दरवर्षी थोड्याअधिक फरकाने दारूची किंमत वाढतेच. आता सध्याचे भाव तुम्हालाही कदाचित माहित असतील पण तुम्हाला माहित आहे का? आपल्याच भारतात अशी काही कॅन्टीन आहेत जिथे अगदी एका पेगहून स्वस्त दारू मिळतेय.

अलीकडेच सोशल मीडियावर एका युजरने कथित नौदलाच्या कॅन्टीनमधील दारूच्या दराचे पत्रक शेअर केले आहे. यात ब्रँडेड दारूचे दर पाहून नेटकरी पार थक्क झाले आहेत. सैन्यातील अधिकाऱ्यांसाठी मद्याच्या रक्कमेत खास सवलत दिली जाते. पण हा फरक इतका जास्त असेल यावर नेटकऱ्यांना विश्वास बसत नाहीये. @anantnofilter या ट्विटर युजरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या दारूचे दर दिले आहेत. हे दर सध्या न पिणाऱ्यांमध्येही चारचा विषय बनले आहेत.

हे ही वाचा<< विकतचं दुखणं! आईच्या वयाच्या महिलेला तरुणाने केलं प्रपोज, भडकलेल्या काकूंनी चारचौघात जे उत्तर दिलं..

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये आपण पाहू शकता की बाहेर महाग दरात मिळणारे ब्रॅण्ड्स या नेव्हीच्या कॅन्टीनमध्ये ५०-६० रुपयात मिळत आहे. अनेकांनी या फोटोखाली कमेंट करून या कॅन्टीनचा पत्ता सुद्धा मागितला आहे. पण वर नमूद केल्याप्रमाणे ही सोय केवळ सैन्याधिकाऱ्यांनाच मिळत असल्याचे समजत आहे. यासंदर्भात अनेकांनी कमेंट मध्ये माहिती दिली आहे. दरम्यान हा फोटो खरोखरच सैन्याच्या कॅन्टीनमधील आहे की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)