सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. काही चोरांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा घातला. अर्थात सोन्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे दृश्य कैद झालंय. पण हा दरोडा घालताना फार मजेशीर गोष्ट चोरांसोबत घडली. सहा चोरांचं टोळकं चोरी करण्यासाठी मलेशियामधल्या केडाई इमास श्री अलम दागिन्याच्या दुकानात शिरलं. रात्रीची वेळ होती तेव्हा दुकान फोडून आतल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा असा त्यांचा बेत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा पूर्ण तयारीनिशी हे टोळकं आत शिरलं. सीसीटिव्ही कॅमेरामध्ये आपले चेहरे दिसू नये यासाठी या सगळ्यांनी हेल्मेट देखील घातली होती. दुकानाचं शटर आतून बंद केल्यानंतर चोरांनी हातोड्यांनी दुकानाच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण एक दोन घाव घालूनही काच काही फुटली नाही. तेव्हा रागाने या चोरांनी आणखी जोरजोरात काचेवर वार करायला सुरूवात केली. पण हाती यश काही आलं नाही. ही काच पॉलीकार्बोनेटपासून बनली होती त्यामुळे सहजासहजी ती तोडणं काही खायची गोष्ट नव्हती. तेव्हा या चोरांना शेवटपर्यंत काही चोरी करण्यात यश आलं नाही. अखेर शक्ती वाया घालवण्यात काही अर्थ नाही हे समजताच चोरांनी तिथून पोबारा केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery fail miserably in kedai emas sri alam jewellery
First published on: 28-07-2017 at 09:20 IST