रमजानचा महिना मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र महिना मानला जातो. महिनाभर ठराविक वेळेला खाऊन मुस्लिम बांधव अल्लाहची उपासना करतात. काही क्षेत्रांमध्ये काम करत असताना तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गोष्टींशी तडजोड करावीच लागते, पायलटही त्याला अपवाद नाहीत. रमझान केला असताना नोकरीला तर पर्याय नाही. मात्र काही संधी जगण्यात नक्कीच आनंद देऊन जातात.
मुस्लिम धर्मातील अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या मक्कामदिना या धर्मस्थळाला पाहून एका पायलटने विमानातच आपला दिवसभराचा उपवास सोडला. विमान चालवत असताना सौदी अरेबियामध्ये असणाऱ्या मक्का मशिदीवर विमान आले, त्यावेळी मशिदीचे दर्शन होत असल्याचे पवित्र मानत या पायलटने दिवसभराचा उपवास खजूर खाऊन आणि पाणी पिऊन सोडला.
यासिर बक्श या सौदीमधील छायाचित्रकाराने ही अनोखी छायाचित्रे टिपली असून ती सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. मक्का ही सौदी अरेबियातील सर्वात उंच इमारत आहे. विमान प्रवास करताना विमान मक्का मशिदीच्या वर आल्यावर पायलटने आपला उपवास सोडला. हे विमान जमिनीपासून २५०० फूट उंचीवर असल्याचे गल्फ न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ही मशिद लंडनमधील बिग बेन टॉवरच्या ३५ पटीने उंच आहे.