Boy Performs Stunts On Railway Platform : तुम्ही अनेक ठिकाणी अॅक्रोबॅटिकचे स्कील्स दाखवू शकता पण रेल्वे स्टेशन ते ठिकाण नाही. कारण एका तरुणाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर कार्टव्हिल स्टंटबाजी करणं चागलंच महागात पडलं आहे. या भन्नाट स्टंटबाजीमुळे या तरुणाला अटकेच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. रेल्वे सुरक्षा दलाने तरुणाचा हा व्हिडीओ ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. पण यूजर्सने या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. तर काहींनी हे योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

“मानपूर जंक्शनमध्ये एका तरुणाने स्टंटबाजी करण्याचा करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. आरपीएफकडून त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे प्रवेश करुन सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारची कृत्य केल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय. या कारवाईच्या माध्यमातून दुसऱ्या लोकांना यातून धडा मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारण अशी माणसं सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी जीव धोक्यात टाकतात. आधी तुमची सुरक्षा..”असं कॅप्शन आरपीएफ इंडिया या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला १.६ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

नक्की वाचा – उर्फी जावेद पुन्हा ट्रोल! किचनमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “कुरकुरे पॅकेटचा वापर…”

इथे पाहा व्हिडीओ

ट्वीटर यूजरने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलं, गूड वर्क आरपीएफ. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रल्वे स्टेशन बनवण्यात आले आहेत. पण काही माणसं बेकायदेशीरपणे प्रवास करतात. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, या तरुणाने बेकायदेशीर कृत्य केल्यासारखं मला वाटत नाही. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी दिसत नाही. जर गर्दीच्या ठिकाणी त्याने असं केलं असतं, तर ते अयोग्य ठरलं असतं. अन्य एका यूजरने म्हटलं, तरुणाचं कौशल्य चांगलं आहे. पण त्याने स्टेशनवर अशा पद्धतीने स्टंटबाजी करणे योग्य नाही.