Viral Video: दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. धावती ट्रेन पकडणे अत्यंत धोकादायक असते, अशी सूचना वारंवार रेल्वेस्थानकावर प्रवाशांना दिली जाते. मात्र, तरीही एखाद्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी अनेक जण धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचे धाडस दाखवतात. तर आज व्हायरल व्हिडीओत अशीच एक घटना घडली आहे. धावती ट्रेन पकडताना एका प्रवाशाचा तोल गेला आहे, पण आरपीएफ पोलिस अधिकारी यांच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.

रविवारी १४ एप्रिल रोजी सज्जन कुमार प्रवासी दुकानात पदार्थ खरेदी करण्यासाठी प्रयागराज जंक्शनवर उतरले तेव्हा ही घटना घडली आहे. गुवाहाटी-बिकानेर ट्रेन (क्र. १५६३४) सकाळी ११.१८ मिनिटांनी प्रयागराज स्थानकावर पोहोचली. ११.३५ मिनिटांच्या सुमारास ट्रेन रेल्वेस्थानकावरून निघाली. हे बघताच ६३ वर्षीय सज्जन कुमार यांनी ट्रेन पकडण्यास धाव घेतली व धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. एसी कोचचे हँडल पकडून ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरामध्ये प्रवासी अडकला आणि तितक्यात रेल्वे संरक्षण दल (RPF) , पोलिस कर्मचारी संजय कुमार रावत यांनी प्रवाशाला मागे खेचलं आणि त्याचा जीव वाचवला आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…बाबांचं प्रेम..! चिमुकल्यांसाठी बनवलं ‘असं’ आईस्क्रीमचं दुकान; घरात लावला बोर्ड अन्… पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रेल्वेनेही या अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. आपला जीव वाचवल्याबद्दल त्या व्यक्तीने रेल्वे पोलिसांचेही आभार मानले आहेत. जयपूरचा रहिवासी असलेल्या सज्जन कुमारला दुसऱ्या ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @CPRONCR या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व संपूर्ण घटनेची माहिती कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे.