अनेकांना प्राणी पाळायला त्यांच्याशी खेळायला आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडते. काही लोक असे प्राणी पाळतात, जे रस्त्यावर वाईट अवस्थेत आढळतात आणि सोडून दिलेले असतात. एका महिलेने रस्त्यावर वाईट अवस्थेत असलेल्या प्राण्याला मांजरीचे पिल्लू समजून घरी घेऊन गेली पण जसा तो प्राणी मोठा होत गेला तेव्हा लक्षात आलं की हा प्राणी मांजर नाही.

व्हिक्टोरिया नावाच्या एका रशियन महिलेला सायबेरियाजवळच्या जंगलात एक मांजराचे पिल्लू सापडले. मांजरीचा जीव वाचवण्यासाठी व्हिक्टोरियाने त्याचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला. पण, तिला कल्पना नव्हती की ती पाळत असलेले मांजरीचे पिल्लू प्रत्यक्षात सायबेरियन प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पँथरचे बाळ होते, ज्याचे नाव लुना होते.

हेही वाचा – Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर झाला अपघात! रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली ट्रेन, पाहा व्हिडीओ

लूना (ब्लॅक पँथर) ला तिच्या स्वतःच्या आईने नाकारले आणि तिचे जीवन सोडून दिले. अशा परिस्थितीत त्याचा मृत्यू होऊ शकला असता पण व्हिक्टोरियाने त्याला वाढवायचे आणि त्याची काळजी घेण्याचे ठरवले. हळूहळू, जसजशी लूना मोठी झाली, तेव्हा हे स्पष्ट झाले की, ती एक ब्लॅक पँथर आहे, जो मानवांसाठी धोकादायक असू शकते.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लुना केवळ व्हिक्टोरियासोबतच राहत नाही तर तिच्या पाळीव कुत्र्यासोबतही तिची चांगली मैत्री आहे. दोघे एकत्र खेळतात आणि फिरतात. दोघांमधील मैत्री पाहता, त्यापैकी एक धोकादायक वन्य प्राणी आहे, याचा अंदाज लावता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पँथर मोठा होताना दिसत आहे.

हेही वाचा – धक्कादायक! लेकीच्या लग्नासाठी बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या १८ लाख रुपयांना लागली वाळवी, महिलेच्या पायाखालची जमीन सरकली

व्हिक्टोरियाने लुनाचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी @Lona_the_pantera नावाचे TikTok खाते तयार केले. या प्लॅटफॉर्मवरून शेअर केलेल्या व्हिडिओने लुनाकडे लोकांचे लक्ष वेधले. जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर लुनाची कहाणी समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक व्हिक्टोरियाचे कौतुक करत असले तरी लुना हा जंगली प्राणी आहे, त्याच्यापासून नेहमी काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्याची काळजी घेणे हे मोठे आव्हान आहे, असा सल्लाही ते देत आहेत.