तुमच्याकडे भन्नाट टॅलेंटची कमी नसेल, तर तुम्ही सोशल मीडियावर प्रकाशझोतात यायला वेळ लागणार नाही. रस्त्यावर डान्स करुन आपली कला सादर करणे, बाईकवर स्टंटबाजी करून टॅलेंट दाखवणे, प्राण्यांसोबत मस्ती करून व्हिडीओ करण्याचं वेडं अनेकांना लागलं आहे. पण एका पठ्ठ्याने साडीच्या दुकानात कमालच केली आहे. एक दोन मिनिटं नाही, तर चक्क १० सेकंदाच त्याने साडी नेसण्याचं टॅलेंट दाखवून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. साडी नेसताना गोंधळ होत असेल, तर काय करायचं? असा प्रश्न ज्यांना पडला असेल, त्यांच्यासाठी या पठ्ठ्याने भन्नाट व्हिडीओ बनवला आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भन्नाट व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून साडी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. अशातच एका साडी विक्रेत्याने साडी नेसायचा जबरदस्त टॅलेंट दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. दुकानात ग्राहकांना साडी खरेदी करण्यात व्यस्त ठेवण्यासाठी अनेक साडी विक्रेते काही ना काही शक्कल लढवत असतात. मोठ्या प्रमाणात साडीची विक्री व्हावी, असं प्रत्येक दुकानदाराला वाटतं. त्यामुळे दुकानात असलेल्या विक्रेत्याला साडी दाखवण्याच्या जबरदस्त स्टाईल दाखवावी लागते. जेणेकरुन दुकानात आलेले ग्राहकांना साडी खरेदी करण्याची आवड निर्माण होईल. असाच काहीसा प्रकार एका साडी विक्रेत्यानं केल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @Punjabi Touch नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय, “या भाऊमुळं माझी साडी खरेदी करण्याची इच्छा झाली.” या व्हिडओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून ४५ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेट नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या व्यक्तीकडे विक्री करण्याचं जबरदस्त टॅलेंट आहे, असं एकाने म्हटलं. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ” इच्छा नसनाही साडी खरेदी करायची इच्छा झाली आहे.” हा मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या उदंड प्रतिसादही मिळत आहे.