आपल्यातील काही जणांना अभ्यास आणि नोकरी एकत्र करणे अवघड वाटते. पण, काही जण असे असतात की, जे शिक्षण व नोकरी या दोन्ही गोष्ट एकत्र करतात आणि आई-बाबांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण आयटीआय (ITI) करता करता कुटुंबाला मदत करण्यासाठी सायकलवरून दररोज ‘स्विगी’च्या ऑर्डर देण्यासाठी जातो. तरुणाची हृदयस्पर्शी गोष्ट ऐकून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल.

हतिंदर सिंग या एक्स (ट्विटर) युजरने सोमवारी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सौरव भारद्वाज नावाच्या तरुणाची हृदयस्पर्शी गोष्ट त्याने रेकॉर्ड केली आहे. सौरव भारद्वाज पंजाबच्या पटियाला शहरात सायकल चालवत फूड डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’च्या ऑर्डर पोहोचवतो. तो चार महिन्यांपासून ‘स्विगी’साठी काम करतो आहे. तसेच तो दररोज ४० किमी सायकल चालवतो आणि संध्याकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत ‘स्विगी’च्या ऑर्डर पोहोचवतो.

हेही वाचा…‘डिजिटल जप माळ’ पाहून थक्क झाले हर्ष गोएंका, म्हणाला, “हा आहे आपला देश!” पाहा Viral Video

पोस्ट नक्की बघा :

सायकलवरून पोहोचवतो ‘स्विगी’च्या ऑर्डर :

तसेच सौरव भारद्वाजचे वडील फोटोग्राफर आहेत आणि आई खासगी शाळेत शिक्षिका आहे. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी हा तरुण पार्ट-टाइम ही नोकरी करतो आणि त्याच्या पगारातून घरातील किराणा मालाचे सामान भरतो. तसेच तरुणाचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. शिक्षण आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळत तो सरकारी परीक्षांचीही तयारी करीत असल्याचे त्याने व्हिडीओत सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Hatindersinghr3 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि “पटियाला येथील हा भाऊ आयटीआय करीत आहे आणि ‘स्विगी’बरोबर फूड डिलिव्हरी बॉय म्हणून कामही करीत आहे. तो ऑर्डर पोहोचवण्यासाठी रोज सायकल वापरतो. त्याच्या मेहनतीला सलाम”, अशी त्याची गोष्ट थोडक्यात कॅप्शनमध्ये लिहिली गेली आहे.