पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा या जोडीची कायम चर्चा असते. शोएब मलिक अत्यंत शांत स्वभावामुळे क्रिकेटच्या मैदानात चर्चेत आहे. मात्र सानिया मिर्झा हिला हे मान्य नाही. शोएब मलिक दिसतो तितका शांत नाही, असं तिने पाकिसानी वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं. शोएबला अँकरने विचारले, ‘तुम्ही तुमच्या पत्नीचा वाढदिवस एक-दोनदा विसरलात, तर तिच्याकडून काय प्रतिक्रिया येते?’ शोएब म्हणाला, ‘अशी प्रतिक्रिया एकदा येत नाही.’ अँकरने विचारले, ‘का काय होते? ‘

‘जेव्हा काही गोष्टी तिच्या आवडीच्या होत नाही तेव्हा तिची रिअॅक्शन येते. या अडथळ्यातून रोज जावं लागतं.’ यावर सानिया हसली आणि म्हणाली, ‘हो, हे खरं आहे.’ त्यानंतर शोएब म्हणाला, ‘मी माझा वाढदिवसही विसरतो.’ तेव्हा सानिया मिर्झा म्हणाली, ‘तू तसाच आहेस. तू तुझा विसरलास, मला त्याची पर्वा नाही, पण तू माझा कसा विसरलास?’ शोएब म्हणाला, ‘बर्थडे विसरणे विसरणे ही मोठी गोष्ट आहे का?’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शोएबने सांगितले की, सानिया खोटे बोलत नाही. होय, सोशल मीडियावर पोस्ट टाकताना ती नक्कीच गोष्टी लपवते. यावर सानिया म्हणाली, ‘मी असे म्हणत नाही की मी खोटे बोलत नाही, परंतु मी नेहमी खोटे न बोलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर अँकरने सानियाला विचारले, ‘शोएब वाटतो तितका साधा आहे का?, हे खरे आहे का?’ सानिया म्हणाली, तो अजिबात साधा नाही.