सध्या सर्वत्र नाताळ साजरा करण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाउनमधील बंधनांमुळे गेली २ वर्ष हा सण मनसोक्त साजरा करता आला नाही. पण यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा केला जाणार आहे. यासाठी सर्वत्र तयारी सूरु झाल्याचे दिसत आहे. नाताळमधील लहान मुलांचे मुख्य आकर्षण असणारा सांताक्लॉजच्या गिफ्टची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या एक सांताक्लॉज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये सांताक्लॉज आणि त्याचा कुत्रा चक्क पॅराग्लायडिंग करत असल्याचे दिसत आहेत. या व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल, पाहा व्हायरल होणारा या व्हिडीओ.
आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
व्हायरल व्हिडीओ:
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला १ कोटी ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.