लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून अकाऊंटमध्ये असणा-या आपल्या मित्र मैत्रिंणींना दाखवण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. यात काहीच गैर नाही. हल्ली लग्न झालेले प्रत्येक जोडपे सोशल मीडियावर फोटो अपलोड करत असतो. पण असे केल्यामुळे नाराज झालेल्या पतीने आपल्या पत्नीला चक्क घटस्फोट दिला आहे. लग्नाचे फोटो हे स्नॅपचॅट, ट्विटर, इंन्टाग्रामवर शेअर करू नये असा या पती पत्नीत करार झाला होता. पण हा करार मोडल्यामुळे रियाधमधल्या एका नव-या लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. डेली मेलनच्या माहितीनुसार पती आणि पत्नीमध्ये अशा स्वरुपाचा कायदेशीर करार झाला होता पण पत्नीला हा मोह अनावर झाला तिने आपल्या लग्नातील काही फोटो हे तिच्या मैत्रिणांना स्नॅपचॅटवर शेअर केले त्यामुळे नाराज झालेल्या या पतीने तातडीने घटस्फोटाची मागणी केली. दोनच दिवसांपूर्वी रियाधमधल्याचे एका पतीने विनामेकअप पत्नी कुरुप दिसत असल्याचे कारण सांगत तिला घटस्फोट दिला होता. सौदीमध्ये ५० टक्के घटस्फोट हे शुल्लक कारणावरून होत असून नवविवाहित जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2016 रोजी प्रकाशित
Viral : लग्नाचे फोटो स्नॅपचॅटवर शेअर केल्याने पत्नीला दिला घटस्फोट
लग्नानंतर अवघ्या दोन तासांत दिला घटस्फोट
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-10-2016 at 19:21 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saudi groom divorces his wife after their wedding pictures shared on snapchat