सध्या सोशल मीडियावर एका विमानातील गोंधळाचा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विमान उड्डाण करताना अचानक अशांततेची स्थिती निर्माण झाल्याच पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ एका इन्फ्लुएन्सरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता, जो सध्यासोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमानाच्या केबिनमध्ये प्रवाशांच्या सीटच्या आसपास खाद्यपदार्थासह इतर काही गोष्टी पडल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, ही घटना पोर्तुगालला जाणाऱ्या विमानात घडली असून ती ब्राझीलच्या डायना एसिस नावाच्या महिला प्रवाशाने शूट केली होती.

या अशांशतेच्या वेळी विमानाच्या केबिनमध्ये काय घडले हे स्पष्टपणे व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये विमानात खाद्यपदार्थासह इतर वस्तू सांडल्याचं दिसत आहे. शिवाय विमानातील दोन्ही बाजूच्या सीट्सच्यामधून ये-जा करण्यासाठी जो रस्ता असतो तो पुर्णपणे खाद्यपदार्थांनी झाकल्याचं दिसत आहे. शिवाय प्रवाशांच्या सीटवरही काही शीतपेयांच्या बाटल्या दिसत आहेत.

हेही पाहा- ‘Bournvita आरोग्यासाठी घातक’ इन्फ्लुएन्सरला ‘तो’ Video बनवणं पडलं महागात, कंपनीने नोटीस पाठवली अन्…

व्हिडीओमध्ये, विमान हालायला लागल्यावर एसिस सुरुवातीला हसताना दिसत आहे, पण अचानक विमान इतक्या जोरात हालायला लागते की, तिच्या ग्लासमधील पेय एका झटक्याने खाली सांडते. यावेळी इतर प्रवासी घाबरुन ओरडायला सुरुवात करतात. एसिसने सांगितले की, टेक ऑफच्या दोन तासांनंतर, जेव्हा प्रवाशांना दुपारचे जेवण दिले जात होते, तेव्हा विमानात गोंधळ झाला, याबाबतचे वृत्त मिररने दिले आहे.

हेही पाहा- लेडीज सीटवर पुरुष बसल्याने दोन बायकांमध्ये राडा; Video पाहून लोक म्हणाले, “फ्री तिकीटचा परिणाम”

तर हा गोंधळ काही सेकंदांसाठीच झाल्याचं प्रवाशाने सांगितलं. मात्र, या घटनेत काही प्रवासी जखमी झाले. केबिन क्रूने तातडीने कारवाई करत जखमींवर प्राथमिक उपचार केले. तर जखमींमध्ये एक लहान बाळाचा समावेश असल्याचंही सांगण्यात आलं आहे. हे लहान मुल त्याच्या पालकांच्या हातातून निसटले आणि थेट विमानाच्या छताला धडकल्याचंही प्रत्यदर्शींनी सांगितलं. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांकडून तत्काळ उपचार करण्यात आले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओंमध्ये विमानाच्या सीलिंग पॅनल्सला तडे गेल्याचे आणि विमानात अन्न देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचे ट्रे ओव्हरहेड डबे पडल्याचं दिसत आहे.