School Student Birthday Party Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनं लोकांना भावुक केलं आहे. एका मुलाच्या वाढदिवसाचा हृदयस्पर्षी व्हिडीओ पाहून अनेकांना रडू कोसळलं आहे. कारण एका लहान मुलाने त्याच्या वाढदिवस कधीच साजरा केला नव्हता. पण त्याच्या शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून त्याला वाढदिवसानिमित्त मोठं सरप्राईज दिलं आहे. हृदयाला स्पर्ष करणाऱ्या या व्हिडीओत मुलाला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सरप्राईज मिळालं आहे. हा क्षण तो मुलगा कधीच विसरू शकणार नाही.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, त्या मुलाचे क्लासमेट्स एकत्र येतात आणि ‘हॅप्पी बर्थडे’ गाणं गातात. त्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. सर्व मित्र त्या मुलाला मिठी मारतात आणि त्याला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देतात. गाणं संपल्यानंतर सुंदर सेलिब्रेशनही सुरु राहतं आणि वाढदिवस स्पेशल करण्यासाठी आनंद व्यक्त करतात. हा जबरदस्त व्हिडीओ इंटरनटवर तुफान व्हायरल झाला असून तमाम नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच हा सुंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भावनिकही झाले आहेत. @naughtyworld नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर वाढदिवसाच्या पार्टीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीही खूप जास्त आनंद देतात.