सोशल मीडिया अनोख्या आणि विचित्र गोष्टींनी भरलेला आहे. इंटरनेटवर दररोज धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर ते खरेही असू शकते की नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्हिडीओबद्दल सांगणार आहोत जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सीगल नावाचा पक्षी काही सेकंदात संपूर्ण जिवंत ससा गिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हालाही धक्का बसेल. हा धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

नक्की काय झालं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक सीगल बिळातील ससा कसा बाहेर काढतो आणि त्याला कसा गिळतो हे दिसत आहे. तो प्रथम त्याचे डोके गिळतो, नंतर काही सेकंदात, तो एकाच वेळी संपूर्ण ससा गिळला. तो ससा गिळत असताना जवळच दुसरा सीगल त्याला पाहत होता. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत. सीगलचे हे रूप तुम्ही क्वचितच पाहिले असेल. बरेच लोक म्हणतात की तो खूप दिवसांपासून भुकेला असेल, म्हणून त्याने संपूर्ण ससा गिळला.

(हे ही वाचा: बाथरूममध्ये घुसला किंग कोब्रा, व्यक्तीने दरवाजा उघडताच…पहा Viral Video)

(हे ही वाचा: पोहताना महिलेच्या कानात घुसला जिवंत खेकडा आणि मग…; बघा धक्कादायक Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर स्टोरीफुल व्हायरलवर पोस्ट करण्यात आला आहे जो आतापर्यंत ५ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि २२ हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ २०२० लचा आहे पण सध्या जो पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे, सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्यापला आहे.