सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. सोशल मीडियापासून ते विकिपीडियापर्यंत निवडणुकीचा रंग चढला आहे. प्रत्येक पक्ष आपला प्रचार करण्यात व्यस्त आहे. अशामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख त्यांच्या प्रोफाईलवर करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या विकिपीडिया प्रोफाईलशी छेडछाड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवार यांच्या प्रोफाईलशी छेडछाड झाल्याचे समोर येताच पुन्हा कोणीतरी त्यांचा उल्लेख देशातील सर्वात इमानदार नेता असा केला.

२४ तासांच्या आत शरद पवार यांच्या प्रोफाईल तीन वेळा बदलण्यात आली आहे. अपडेट प्रोफाईलमध्ये त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध नेता असा उल्लेख विकिपीडियावर करण्यात आला आहे. काही नेटीझन्सनी ट्विटरवर याबाबत आपले मत व्यक्तही केले आहे.

विकिपीडियावरील माहितीत कुणालाही बदल करता येतात त्यामुळे हा प्रकार घडला. याआधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत हा प्रकार घडला होता. विकिपीडियावरील छेडछाड सध्या दुरूस्त करण्यात आली आहे. मात्र या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar mentioned as most corrupt indian politician on wikipedia later changed to most loyal
First published on: 26-03-2019 at 12:58 IST