Shikhar Dhawan Emotional Instagram Post: दिल्ली न्यायालयाने शिखरला मोठा दिलासा दिला असून मानसिक छळाच्या पार्श्वभूमीवर पत्नी आएशा मुखर्जीपासून त्याचा घटस्फोट मंजूर केला आहे. २०१२ साली शिखर धवन आणि आएशा मुखर्जी विवाहबद्ध झाले होते,त्यांना झोरावर धवन नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे. आएशा आणि झोरावर हे दोघेही ऑस्ट्रेलियन नागरिक असून ऑस्ट्रेलियातच वास्तव्यास आहेत.

आएशा यांनी धवनला त्यांचा मुलगा झोरावर पासून लांब राहण्यास भाग पाडल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला असे न्यायालयाने मान्य केले असले तरी मुलाचा संपूर्ण ताबा धवनला देण्यात आलेला नाही. त्याऐवजी, धवनला मुलगा झोरावरला ठराविक कालावधीसाठी भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून धवनला लेकाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आता धवनने लेकासह व्हिडीओ कॉलचा एक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. धवनची पोस्ट नेटकऱ्यांना भावुक करून गेली आहे.

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, “‘एक अजीब सी बेताबी है तेरे बिन, रह भी देते हैं और रहा भी नहीं जाता.’ – गुलजार साहब,” स्क्रीनशॉटमध्ये, झोरावर त्याच्या हुडीच्या खिशात हात ठेवून उभा असलेला दिसतो, तर शिखर धवन हसत आहे.

शिखर धवन पोस्ट

हे ही वाचा << IND vs PAK: पाकिस्तानच्या हरण्याचं कारण वासिम अक्रमनं केलं उघड! म्हणाला, “महिन्यातून एकदा..” 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट काही तासांपूर्वी शेअर करण्यात आली होती. त्यानंतर २४ लाखाहून अधिक व्ह्यूज या पोस्टला मिळाले आहेत. बर्‍याच जणांनी व्हिडिओवर कमेंट करत शिखर धवनच्या धैर्याचे कौतुक केले आहे. आपल्या बाळापासून लांब राहणे हे एखाद्या आईसाठी जितके दुःखद असते तितकाच वडिलांना सुद्धा त्याचा त्रास होतो आम्ही आशा करतो की तुम्हाला लवकरच एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळेल, अशा पद्धतीच्या कमेंट्स सुद्धा या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.