Aaditya Thackeray Reacts To Wedding: महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा पिढीत ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे अनेकदा चर्चेत असतात. अनेक तरुण उद्योजकांना पाठिंबा व प्रोत्साहन देण्याचे काम सुद्धा आदित्य करतात. तरुणाईचा आवडता प्लॅटफॉर्म म्हणजेच इंस्टाग्रामवर सुद्धा आदित्य ठाकरे सक्रिय असतात. अलीकडेच आदित्य यांनी एका कार्यक्रमात आपल्या खाजगी आयुष्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देत अत्यंत मजेशीर मुलाखत दिली. महाराष्ट्रातील आवडत्या लोकांविषयी तसेच आपल्या फोनमधील काही सिक्रेट्सविषयी सुद्धा आदित्य ठाकरेंनी भाष्य केले. याच कार्यक्रमात आदित्य यांना लग्नाविषयी विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी लाजून दिलेले उत्तर सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आदित्य ठाकरेंना काही सेकंदात झटपट उत्तरे देण्यास सांगितले जाते. यावेळी आदित्य यांनी आपल्या आवडीनिवडीविषयी काही खुलासे केले, आदित्य ठाकरे सांगतात की, “मला महाराष्ट्राविषयी सगळं काही आवडते पण इथली लोकं, इतिहास व भूगोल अत्यंत सुंदर आहे.” आपल्या फोनच्या स्पीड डायलवर कोणाचा नंबर आहे हे सांगताना आदित्य यांनी आई, बाबा व भावाचे नाव घेतले. महाराष्ट्रात फिरायला कुठे जायला आवडते यावर आदित्य यांनी महाबळेश्वरचे नाव घेतले.

या सगळ्यानंतर दोन महत्त्वाचे प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आले. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही स्वतःविषयी ऐकलेली सर्वात मजेशीर खोटी बातमी कोणती? ज्यावर आदित्य म्हणतात, “अशा अनेक बातम्या खोट्याच आहेत, अगदी मी एखाद्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये घर घेतल्यापासून ते अगदी कुठल्याही मर्यादेशीवाय रुमर्स पसरत असतात” आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही लग्न कधी करणार? आदित्यने लग्नाच्या प्रश्नावर दिलेले उत्तर जरी खूप साहजिक असलं तरी वेगळंच बोलून जात आहे हे ही खरं.

आदित्य ठाकरेंनी लग्नाच्या प्रश्नावर सांगितलं..

दरम्यान, या व्हिडिओवर अनेक समर्थकांनी कमेंट करून आदित्य ठाकरे हे सर्वात युथफूल नेते असल्याचे म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून ही कमेंट खरी वाटते का हे नक्की कळवा.