Shivshahi Bus Accident Viral Video : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे तर काही दुसऱ्यांच्या चुकीमुळे घडतात. असाच एका शिवशाही बसच्या लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अक्षरश: अंगावर काटा उभा राहील. हा व्हिडीओ पाहून गाडी चालवताना किती सतर्क राहिले पाहिजे हे समजत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये एका शिवशाही बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्ता सोडून अचानक दुसऱ्या रस्त्यावर वळते, यानंतर पुढच्याच क्षणी ती एका डोंगराला जाऊन जोरात धडकते. हा अपघात इतका भीषण आहे की पाहतानाही भीती वाटते.

बस रस्त्यावरून वळण घेत थेट दुभाजक तोडून गेली अन्…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हायवेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. यावेळी एक शिवशाही बस भरधाव वेगात धावतेय. यावेळी अचानक बस रस्त्यावरून वळण घेत थेट दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर वळते, यानंतर ती थेट जाऊन डोंगराला जाऊन आदळते. यात बसच्या पुढच्या बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या अपघाताची थरारक दृश्य मागून येणाऱ्या वाहनातील व्यक्तीने अतिशय अचूकपणे कैद केली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवशाही बस अपघाताचा हा व्हिडीओ एक्सवर @Deadlykalesh नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांकडूनही अनेक कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘जर एखादी बस सहजपणे रेलिंग तोडून दुसऱ्या बाजूला जाऊ शकते, तर या रेलिंगचा उद्देश काय?’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘ड्रायव्हरला एकतर झोप लागली किंवा त्याला स्ट्रोक आला असेल किंवा कदाचित त्याचा टायर फुटला असेल. आशा आहे की सर्वजण सुरक्षित असतील. शेवटी एकाने लिहिले की, “मला वाटतं तो ड्रायव्हर नशेत होता.”