Giant Anaconda Snake Viral video : प्राण्यांमध्ये सापाविषयी प्रत्येकाच्या मनात एक विचित्र भीती असते. अनेकांना सापाचे नाव ऐकले तरी घाम फुटतो. जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. ज्यात विषारी सापांपासून ते अजगर, अॅनाकोंडासारख्या शिकारी सापांचा समावेश आहे. एकदा का कोणता प्राणी, मनुष्य यांच्या विळख्यात अडकला तर मृत्यू हा निश्चित असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक भलामोठा अँनाकोंडा दिसतोय. यात या सापाचा आकार पाहून कोणाचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारा साप हा अॅनाकोंडा आहे, जो आकाराने बराच मोठा आहे. व्हिडीओमध्ये लोकांची घरंदेखील दिसत आहेत. हा साप मानवी वस्तीत मुक्तपणे फिरताना दिसतोय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असेही म्हटले आहे की, ब्राझीलमधील लोकांसाठी ही एक सामान्य घटना आहे, म्हणजेच इतका मोठा साप पाहणे लोकांसाठी एक सामान्य गोष्ट आहे. हा साप किती मोठा आणि जाड आहे हे व्हिडीओ पाहूनच समजू शकेल.
अॅनाकोंडा सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो @AMAZlNGNATURE नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर युजर्सकडून विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला सापांची भीती वाटत नाही, पण हे भयानक आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘अलेक्सा माझी ब्राझीलची फ्लाइट रद्द कर.’ काही युजरने हा फारच भयानक व्हिडीओ आहे, असे म्हटले आहे.