सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण जीवघेणे स्टंट करतात. अनेकदा स्टंट करताना दुखापत झाल्याचंही समोर आलंय. मात्र, तरुण मंडळी स्टंट करणं काही सोडत नाही. स्टंट फक्त तरुण करतात असंही नाही. लहान मुलांपासून तरुणांपर्यत स्टंट करताना दिसून येतात.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती स्वत:ला पेटवून स्टंट करताना दिसत आहे. अशी खरं तर जीवावर बेतू शकते किंवा कायमस्वरुपी अपंगत्व येऊ शकते. मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापुढे बाकी सर्व बाबी गौण असल्याचं दिसत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
अनेकदा स्टंटमन सुरक्षा उपकरणांचा वापर करून स्टंट करताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या एका क्लिपमध्ये स्टंटमन कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय पुलाच्या वर स्वत:ला पेटवून घेताना दिसत आहे. त्यादरम्यान ती व्यक्ती पुलाच्या वरच्या बाजूला मागे नदीत उडी मारताना दिसत आहे. नदीत उडी मारल्यानंतर आग विझते. पण जरासाही उशीर झाला असता तर मात्र शारीरिक इजा झाली असती. व्हिडीओवरुन असा अंदाज लावला जातोय की या स्टंटसाठी या तरुणानं खूप सराव केला असावा.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

या व्हिडीओला ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. बहुतेक युजर्स स्टंटबद्दल त्या व्यक्तीचे कौतुक करताना दिसतात. तर काही जण असे जीवघेणे स्टंट करून नका असे सल्ले देत आहे. अशा प्रकारचे कोणतेही जीवघेणे स्टंट करु नये. अशा स्टंटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तरुणानं सराव केला आहे. त्यामुळे तो योग्यरित्या एका स्वत: ला पेटवून पाण्यात उडी मारू शकला. मात्र, अशा प्रकारचे स्टंट करणे पूर्णपणे चुकीचंच आहे.