Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टंटबाजी करताना एका तरुणाचा भीषण असा अपघात झाला आहे. यामध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच खेळ खल्लास झालाय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही श्वास थांबेल.काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं.
रस्त्यावर प्रचंड स्पीडमध्ये ५ ते ६ तरुण बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी करत आहेत. यावेळी सर्वजण आपआपल्या बाईकवर अक्षरश: झोपले आहेत आणि झोपून बाईक चालवत आहेत. यावेळी स्पीडमध्ये असल्यामुळे समोर असलेला ट्रक एका तरुणाला दिसत नाही तो जोरात ट्रकला धडकतो. ही धडक एवढी जोरदार होती की तोतरुण अक्षरश: उडून रस्त्यावर पडतो. काही क्षणाच्या मजेसाठी अशाप्रकारे जीव जाऊ शकतो त्यामुळे तरुणांनी अशाप्रकारे स्टंटबाजी करताना विचार करावा.
पाहा व्हिडीओ
हा घडलेला प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला विचारा आयुष्याची किंमत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.तर आणखी एकानं, इतर मित्रांनीही यातून धडा घ्या अशी प्रतिक्रिया दिली आहे.