Viral video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मंगळवारी एका बहुमजली इमारतीत आग लागली. आगीचा विळखा इतका वाढला की, पाचव्या मजल्यावर अडकलेल्या एका महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मात्र, यानंतर असं काही घडलं की व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इमारतीला आग लागली होती. सुरुवातील साधारण वाटणाऱ्या या आगीने रौद्र रुप धारण केले. दरम्यान या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एक महिला अडकली गेली. परंतू घरात झालेल्या आगीच्या लोटामुळे महिलेला बाहेर पडणे शक्य झाले नाही. अखेर महिलेने घराच्या खिडकीतून उडी मारली आणि खाली असलेल्या लोकांनी महिलेला दुखापत न होऊन देता वाचवले. दरम्यान ही घटना एका नागरिकाने मोबाईलमध्ये टिपली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये मंगळवारी एका बहुमजली निवासी इमारतीला आग लागली . इंदिरा पुलाजवळील एका इमारतीत आग नियंत्रणाबाहेर गेल्यावर एका महिलेने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला. खाली उभ्या असलेल्या लोकांनी महिलेला जमिनीवर पडू दिले नाही आणि कसा तरी तिचा जीव वाचवला. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणली. या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना अहमदाबादच्या अत्रेय ऑर्किड सोसायटीमध्ये घडली. गुजरातमध्ये गेल्या वर्षी राजकोटमधील टीआरपी गेमझोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत २८ जणांचा मृत्यू झाला होता.
पाहा व्हिडीओ
अग्निशमन दल बचाव कार्य करत असताना एका महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी, इमारतीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. सुदैवाने, खाली असलेल्या लोकांनी गाद्या अंथरल्या होत्या आणि ती महिला वाचली. इमारतीतील आग एसी सिस्टीम मधून लागल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. जेव्हा धूर येऊ लागला तेव्हा मोठ्या संख्येने लोक जमले पण आग उंचावर लागली असल्याने लोकांना तीथपर्यंत पोहोचता आले नाही.