Elephant video viral: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं. जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले जमिनीवर पडलेली दिसत आहेत आणि त्यांच्यामधून एक मोठा हत्ती जात आहे.हत्ती खूप काळजीपूर्वक आपले पाय ठेवत आहे. मात्र चुकून जरी हत्तीचा अंदाज चुकला तर जागी जीव जाऊ शकतो. तरीही या मुलांनी एवढी मोठी रिस्क घेऊन त्याठिकाणी झोपले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मुले जमिनीवर झोपली आहेत तर एक मुलगा तिथे उभा आहे आणि हत्तीला मार्गदर्शन करत आहे जेणेकरून तो मुलांमधून जाऊ शकेल. हत्ती अगदी अचूक पावले उचलत आहे आणि अखेर मुलांना दुखापत न करता त्यांच्यामधून जात आहे असे दिसते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ _damnarm नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून लाखो वापरकर्त्यांनी तो पाहिला आहे. जवळजवळ ३ लाख वापरकर्त्यांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.काहींनी या प्रकारच्या कृतीला धोकादायक म्हटले आहे. तर काहींनी म्हटले आहे की प्राणी माणसांपेक्षा जास्त निष्ठावान असतात.

व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले, “जर हत्ती गुंडगिरीच्या मूडमध्ये असेल तर काय होईल?” दुसऱ्या युजरने म्हटले, “एक चूक, दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये.” तिसऱ्या युजरने म्हटले, “अशी सामग्री बनवा की कोणीही त्याची कॉपी करू शकणार नाही.”त्याच वेळी, दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, “मानवांनी माणसांचा विश्वास तोडला आहे आणि प्राण्यांना विश्वासू मानू लागले आहेत.”