Parenting Warning Viral Video: एका छोट्याशा खेळाने गंभीर वळण घेतलं आणि एका चिमुकलीचा जीव अक्षरशः टांगणीला लागला. घराच्या अंगणाबाहेर खेळता खेळता एका चिमुरडीवर जीवघेणं संकट आलं आणि काही क्षणांत सगळीकडे हाहाकार उडाला. हा थरारक प्रकार पाहणाऱ्यांचे अंग शहाऱ्यानं भरून येत आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या…
एका निष्पाप चिमुरडीसाठी घरातला साधासुधा फर्निचर जीवघेणा ठरू शकतो, हे दाखवणारा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीचं डोकं खुर्चीच्या फटीत अडकल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये दिसतं की, एक लहानशी मुलगी खेळता खेळता घरातील प्लास्टिकच्या खुर्चीच्या फटीत डोकं अडकवते. सुरुवातीला तिचे पालक स्वतःच्या पद्धतीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जेव्हा काहीच उपयोग होत नाही तेव्हा शेवटी खुर्चीला कापण्याचा निर्णय घेतला जातो.
कायमची इजा किंवा गुदमरून श्वास घेणं अशा गंभीर संकटात ही चिमुरडी सापडली असतानाही, काही मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तिची सुरक्षित सुटका होते आणि उपस्थित लोक सुटकेचा नि:श्वास टाकतात.
व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले
हा व्हिडीओ @mava_bastar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आणि हजारोंनी लाईक केलाय. अनेक युजर्सनी पालकांना “अशा प्रसंगांपासून शिकण्याचा सल्ला” दिला आहे. “मुलांवर लक्ष ठेवणं हे केवळ काळजी नाही तर गरज आहे,” असं एका युजरने म्हटलं.
अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, हे पहिलेच उदाहरण नाही. काही दिवसांपूर्वी तेलंगणातील यादगिरीगुट्टा मंदिरात एका सहा वर्षीय मुलाचं डोकं लोखंडी गजांमध्ये अडकलं होतं, तर मध्य प्रदेशात एका मुलाने खेळता खेळता भांड्यात डोकं अडकवून बसल्याची घटना घडली होती आणि अखेर भांडं कापून त्याची सुटका करण्यात आली होती.
येथे पाहा व्हिडीओ
पालकांसाठी सतर्कतेचा इशारा!
या प्रकारांवरून स्पष्ट होतं की, मुलं निरागस असली तरी प्रसंग गंभीर बनू शकतो, त्यामुळे पालकांनी मुलांच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा एक क्षुल्लक चूकही मोठ्या दुर्घटनेत बदलू शकते. ही घटना केवळ एक अपघात नव्हे, तर प्रत्येक पालकासाठी सतर्कतेचा गंभीर इशारा आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि अनेकांनी त्यावर चिंता व्यक्त करत “बाळांवर लक्ष ठेवणं ही जबाबदारी नाही, गरज आहे” असं ठामपणे सांगितलं आहे.