Mumbai Local Viral Video: मुंबईच्या लोकलमधील महिलांचा डब्बा हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. या डब्यात जितकी भांडणं होतात तितक्याच कठीण प्रसंगात महिला एकमेकांना साथ देतानाही दिसतात. महिलांच्या डब्यात दरवेळी काही ना काही नवीन पाहायला मिळतं.

लांबचा प्रवास असल्याने काही महिला तर ट्रेनमध्येच भाजी निवडताना दिसतात. तर काही महिला उशीर झाला म्हणून थेट ट्रेनमध्येच मेकअप हेअरस्टाईल करतात. आता या सगळ्या गोष्टी मुंबईकरांसाठी अगदी सामान्य झाल्या आहेत. मुंबई लोकलचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात साप शिरल्याचं बोललं जातंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊ या…

मुंबई लोकल व्हायरल व्हिडीओ (Mumbai Local Ladies Coach Viral Video)

मुंबई लोकलचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल हसावं की रडावं. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लोकलच्या लेडीज डब्यातील काही महिला जोरजोरात ओरडतायत किंचाळतायत तर काही महिला थेट सीटवरच उभ्या राहिल्या आहेत. पण नेमकं असं घडलं तर काय ज्यामुळे या महिला असं वागतायत.

तर व्हिडीओच्या कॅप्शननुसार या लेडीज डब्यात साप शिरलाय असं सांगितल्यावर महिलांची पळता भुई थोडी झाली. सापाच नाव ऐकताच त्या घाबरल्या, गोंधळल्या आणि सीटवर चढू लागल्या. दरम्यान, साप शिरलाय ही अफवा असल्याचं नंतर लक्षात आलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @virarmerijaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “कोणीतरी अफवा पसरवली की ट्रेनमध्ये साप आला आहे” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला १ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठली आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Snake in Ladies Coach)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बिचारा साप घाबरून लपून बसला असेल सर्व इच्छाधारी नागीण बघून” तर दुसऱ्याने ”साप आहे तरी कुठे” अशी कमेंट केली.