Nashik viral video: राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील ३ ते ४ दिवसात राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच मुंबईसह राज्यभरात वादळी वारा सुरु झाला आहे. दरम्यान प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होतेच. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.

नाशिकच्या अशोकनगर भागात जोराचा वादळी वारा सुरु झालाय. वादळी वाऱ्यानं थैमान घातलंय. यावेळी वादळी वाऱ्यामुळे एक पत्रा उखडला गेला. हा पत्रा एका तरुणाच्या अंगावर पडणार होता. पण हा तरुण थोडक्यात बचावलाय. अनेक घरांचे पत्र या वादळात उडाले आहेत. त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. तरुण बाईकवर बसत होता. इतक्या वाऱ्याच्या वेगानं एक पत्रा हवेत उडत त्यांच्या दिशेनं आला. मात्र वेळीच मान खाली केल्यानं मोठा अनर्थ टळलाय.हवेत उडालेला पत्रा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यात जाऊन घुसला असता. मात्र, तो वेळीच खाली वाकल्याने तरुण थोडक्यात बचावला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. आपण सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सावधगिरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”