Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही तर काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. काही व्हिडीओ तर अतिशय धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी उंच झाडाच्या फांदीवर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. या तरुणीचा हा थरारक डान्स पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक निसर्गरम्य परिसर दिसेल. या परिसरात एक उंच झाड तुम्हाला दिसेल. या झाडाच्या सर्वात वरच्या दोन फांद्यांवर एक तरुणी उभी आहे आणि ती डान्स करतेय. त्या फांद्या इतक्या ठिसूळ आहेत की कधीही तुटू शकतात. तरी सुद्धा ही तरुणी धोका पत्करून डान्स करताना दिसत आहे. ती ” झांझरिया उसकी छनक गई. चुनरी भी सर से सरक गई” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती डान्सच्या सर्व स्टेप्स करताना दिसते. डान्स करताना थोडा जरी तोल गेला तरी ती तरुणी खाली पडू शकते. हा डान्स पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Pooja Guleria (@miss_pooja_official_887)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

miss_pooja_official_887 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “झाडांची राणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ श्वास रोखून पाहिला व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “यमराज सुट्टीवर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “डान्स ही करत आहे आणि भीती मला वाटत आहे” एक युजर लिहितो, “रील बनवण्याच्या नादात मूर्ख झाली आहे आताची पिढी. थेट झाडावर चढली, जमीनीवर जागा कमी होती का?” तर एक युजर लिहितो, “जीव एवढा स्वस्त आहे का?” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी हा मूर्खपणा असल्याचे लिहिलेय.