Shocking video: प्रत्येक भारतीय घरामध्ये दूध हा पदार्थ नानाविध कारणांसाठी वापरला जातो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश असतो. दुधाचे सेवन करणे शारीरिक वाढीसाठी फायदेशीर असते. यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे लहान मुलांना सतत दूध पाजले जाते. दही, लोणी असे पदार्थ दुधापासून बनवले जातात. याशिवाय चहा, कॉफी, मिठाई बनवतानाही दुधाचा प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का हे दूध तुमच्या घरी कसं येत? कुठून येतं? सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये दुधात कशी भेसळ केली जाते हे दिसतंय. हा धक्कादायक व्हिडीओ पाहू तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दुधाची हीच गरज आणि उपयुक्तता पाहून काही लोक काही नफ्यासाठी दुधात भेसळ करतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात.समोर आलेला व्हिडीओही असाच आहे यामध्ये लोकांच्या जीवाशी कसं खेळलं जातंय हे पाहायला मिळतंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गरम पाण्यात कोणतंतरी एक तेलासारखा पदार्थ मिसळल्यानंतर तो पांढरा होत आहे. आपल्याला भेसळयुक्त दूधातला आणि चांगल्या दुधातला फरकही कळणार नाही अशाप्रकारे हे दूध दिसत आहे. त्यामुळे दूध घेताना योग्य ठिकाणाहून घ्या.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DNRmQPgznxm/?utm_source=ig_web_copy_link
भेसळयुक्त दूध कसे ओळखावे?
माल्टोडेक्सट्रिन पावडर, रिफाइंड ऑईल आणि हायड्रोजन पेरोक्साइड हे घटक दुधामध्ये मिसळून त्यात भेसळ केली जाते. दुधाचा वास घेऊन किंवा त्याची चव घेऊन त्यात भेसळ झाली आहे की नाही हे ओळखता येते. भेसळ असलेले दूध शुद्ध दुधाच्या तुलनेत पातळ असते. भेसळयुक्त दुधाची चवदेखील वेगळी असते. याव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींच्या मदतीने दुधाची शुद्धता तपासता येते.
दुधाची शुद्धता तपासण्यासाठी पुढील ट्रिक्सची मदत घेता येईल.
१. दुधाची शुद्धता तपासण्यासाठी सर्वप्रथम दुधाचे काही थेंब जमिनीवर टाकावेत. जमिनीवर टाकलेल्या थेंबाकडे थोळा वेळ लक्ष द्यावे. दुधाचे थेंब जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या खुणा दिसत असेल, तर ते दुध शुद्ध आहे. जर हे थेंब खाली पडल्यावर लगेच वाहू लागले, तर त्या दुधामध्ये भेसळ आहे हे समजून जावे