Shocking video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर दुसरीकडे बगळा बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. त्याची सर्वात वैश्यिठ्यपुर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग. हे दोघेही अनुभवी आणि खतरनाक शिकारी आहेत अशात दोघांमधील या युद्धात नक्की कोण कोणावर भारी पडतं? आणि कोणाचा यात विजय होतो? हे तुम्हीच पाहा.
जंगली प्राण्यांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. वाघ, सिंह, बिबट्या, मगरी अशा खतरनाक शिकाऱ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. बरं, या व्हिडीओंमध्ये कधी कोणी झाडावर चढून शिकार करताना दिसतं, तर कोणी थेट पाण्यात सूर मारतं. काही वेळा तर जबरदस्त टक्करचे मुकाबले सुद्धा होतात.‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच थरार साप आणि बगळा यांच्यामध्ये पाहायला मिळाला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बगळ्यानं सापाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. बगळ्याला वाटलं की आपण सहज सापाची शिकार कर शकतो मात्र तिथेच सापानं डाव पलटवला. सापानं थेट बगळ्याच्या मानेभोवती वेढा घातला. यामुळे बगळ्याला सापाची शिकारच करता येत नव्हती. लांब मान असल्याचा गर्व बाळगून सापाची शिकार करायला गेलेल्या बगळ्याची चांगलीच फजिती झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mountdorabuzz नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, एकडे प्रत्येकजण जगण्यसाठी संघर्ष करत असतो. तर आणखी एकानं, “म्हणून कुणालाच कमी समजू नका” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.