Woman Dance Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण सोशल मीडियावरून मिळणाऱ्या या प्रसिद्धीसाठी लोक आजकाल काहीही करू लागले आहेत.

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मर्यादा ओलांडू लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात, एका व्हिडीओसाठी एक महिला थेट आगीशी खेळू लागली आहे. नेमकं या व्हिडीओमध्ये महिलेने काय केलंय, जाणून घेऊ या…

रीलसाठी साडीला लावली आग (Saree set on Fire for Reel)

महिलेचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक महिला रिलसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आगीशी खेळताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ‘दिवानी दिवानी’ या हिंदी गाण्यावर एक महिला थिरकताना दिसतेय. पण महिला डान्स करता करता धक्कादायक स्टंट करतानादेखील दिसत आहे.

व्हिडीओत दिसून येतंय की, महिलेने साडी नेसली आहे आणि ती डान्स करत आहे. साडीने पेट घेतला असूनही ती डान्स करताना दिसतेय. फक्त रीलसाठी आणि काही लाईक्स आणि व्ह्युजसाठी ती हे सगळं करताना दिसतेय. साडीच्या पदराने पेट घेतला असूनही महिलेचा डान्स काही थांबत नसल्याचं आपण पाहू शकतो.

woman fire dance
woman fire dance

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @kabita20216666 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.१ मिलियन व्हयुज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कृपया करून असे स्टंट करू नका” तर दुसऱ्याने “थोड्या पैशांसाठी असा स्टंट करणं किती योग्य आहे. यांना स्वत:च्या जीवाचीपण पर्वा नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “रीलसाठी मर्यादाच ओलांडली”