Shocking video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये रोज अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. संकट कधी कोणावर सांगून येत नाही, यामध्ये बऱ्याचदा अपघाताच्या घटना समोर येत असतात. असाच एक थरारक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका गोडाउनमध्ये काम करत असताना कामगारांवर धान्याची पोती मोठ्या संख्येने अंगावर कोसळली आहेत. पण पुढे असे काही घडते की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

‘संकट सांगून येत नाही…’

आपल्या आयुष्यात कधी, कुठल्या क्षणी कोणतं संकट येईल हे सांगता येत नाही. काही जण या संकटांमधून स्वतःची सुखरूप सुटका करून घेतात, तर काही जण त्या संकटापासून दूर पळून जाऊन हार मानतात. आयुष्यातील या संकटांपासून नेहमीच कुठलीतरी शिकवण मिळते. त्यामुळे नेहमी सावध राहिलं पाहिजे हेच या व्हिडीओतून समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मजूर काम करताना दिसून येत आहे. त्यांच्या आजूबाजूला थरावरथर मांडलेली पोती दिसत आहेत. अशातच व्हिडिओत काही मजूर ज्या पोत्यांच्या बाजूला आहेत. मात्र क्षणार्धात सर्व जड पोती त्या मजूरांच्या अंगावर पडतात. सर्व मजूर त्या पोत्यांच्या खाली अडकलेली दिसून येत आहेत. सर्व घटना त्या गोडाउनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. दरम्यान यामध्ये आश्चर्याची एक गोष्ट म्हणजे, ५ जणांमधला एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली येता येता वाचतो बाकी सगळे या गोण्यांच्या खाली अडकतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “नशिबापुढे मेहनतीचंही नाही चाललं” अवघ्या २ सेकंदात ‘या’ मुलासोबत जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @UttarandhraNow नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “भयंकर आहे हे”. “काळजी घेणं गरजेचं आहे शेवटी जीव महत्त्वाचा आहे” “केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचला” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.