Shocking video : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करीत आहेत. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुले एकेकटी जात असली की, हे कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे अंगावर धावून येत हल्ला करतात. त्यामुळे आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढविण्याचे हे प्रमाण खूपच वाढत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कोणाची?

कुत्र्यानं केलेल्या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,एक माणूस रस्त्याच्या कडेला उभा आहे. त्याच्या शेजारी एक कुत्रा उभा असल्याचे दिसले. तो भटका प्राणी हळू हळू या माणसाच्या जवळ आला. त्यानंतर कुत्रा माणसाच्या खूपच जवळ जाऊ लागला, यावेळी जवळपास एक मिनिटापर्यंत तो व्यक्ती प्राण्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही वेळाने कुत्र्याने माणसावर हल्ला केला आणि कुत्र्याच्या वर्तनात अचानक झालेल्या बदलामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. कुत्र्याने अचानक आक्रमक प्रतिक्रिया दिली, कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली आणि त्याच्यावर हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्यात त्याचा हात चावला आणि तो जखमी झाल्याचं दिसत आहे. काही वेळातच, शेजारी उभ्या असलेल्या कार धुत असलेल्या एका व्यक्तीने कुत्र्याला मारत व्यक्तीला वाचवलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुण्यात भर चौकात तरुणानं झळकवली पाटी; पाहून सगळेच थांबू लागले; असं लिहलंय तरी काय? तुम्हीच पाहा VIDEO

कुत्रा अचानक हिंसक का झाला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाश शुक्ला, जो स्वतःला इंस्टाग्रामवर प्राण्यांच्या वर्तनाचे वर्णन करतो, त्याने या घटनेची दखल घेतली आणि सांगितले, ” ज्यावेळी कु्त्र्यांना असुरक्षित वाटतं तेव्हा ते हिंसक होतात आणि हल्ला करतात असं हा तरुण सांगत आहे. “लक्षात ठेवा, कुत्र्याची पहिली भाषा ही एनर्जी बॉडी लँग्वेज आहे. त्यामुळे जर आपण कुत्र्याशी काहीही बोलण्याचा प्रयत्न केला तर ते कदाचित गोंधळातील.” तो पुढे म्हणाला, आता आम्हाला व्हिडिओमागील संदर्भ माहित नाही किंवा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी हा कुत्रा आणि माणूस काय करतो किंवा आजूबाजूला काय घडलं होतं हे माहिती नाही. परंतु असे काहीतरी नक्कीच होते ज्यामुळे कुत्र्याला असुरक्षित वाटले”