अनेकदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की प्राणी हेच माणसांचे सर्वात जवळचा मित्र असतो. त्यांच्या इतकं ईमानदार कोणीच असू शकत नाही. मात्र, अनेक लोक असे असतात ज्यांना प्राण्यांबद्दल अजिबातही प्रेम वाटत नाही. प्राण्यांना त्रास देण्यात त्यांना मजा येते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. अशाच एका ठिकाणी चक्क बेडकाला आगीच्या निखाऱ्यात टाकलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू सगळेच संतापले आहेत.
पावसाळ्यात बेडकांचं प्रमाण वाढत असतं, अशावेळी त्यांच्या आवाजाचाही अनेकदा त्रास होतो मात्र त्यावर उपाय त्यांना मारून टाकणे नाही. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका बेडकाला चक्क जळत्या राखेत टाकलं आहे. या राखेत तो तडफडत असून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला निखाऱ्यातून बाहेर पडता येत नाहीये. यावेळी त्याला त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसतंय मात्र त्याला बाहेर काढायचं सोडून त्याला व्हिडीओ काढण्यात लोक व्यस्त आहेत.
यावेळी आगीत बेडूक होरपळताना, तडफताना दिसत आहे. तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यातून त्याला बाहेर पडता येत नाहीये. अतिशय क्रूरपणे हा प्रकार करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ smile_please_1956 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, “घाबरु नको शेवटी इथेच फेडायच ए तुला, देवापेक्षा कर्म मोठे आहेत भाऊ हिशोब होणार” तर आणखी एक म्हणतो, “एक वेळ देव माफ करेल पण कर्म प्रत्येक पापाचं हिशोब ठेवतो”