Shocking Video Viral : मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी कोणालाही नकोशी वाटते. त्यामुळे प्रत्येकजण मृत्यूला घाबरतो. एवढेच काय याच भीतीपोटी लोक स्मशानभूमीतही जात नाही, कारण स्मशानात चितेवर जळणारे प्रेत आणि कुटुंबाचा आक्रोश हे वातावरणचं फार भयानक असतं. पण अशा परिस्थितीत स्मशानभूमीत कोणी जळणाऱ्या प्रेताजवळ उभं राहून कोण नाचतयं? हे ऐकून धक्का बसेल ना? पण हे खरं आहे. एक तरुणी चक्क जळत्या चितेजवळ उभी राहून हसत नाचताना दिसतेय, तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ज्या स्मशानात जाण्यासाठी लोक घाबरतात तिथे ही तरुणी जाऊन नाचतेय हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, स्मशानात चितेवर एक प्रेत जळत असल्याचे दिसतेय. तिथेच एक तरुणी उभी राहून चक्क आनंदाने नाचत रिल शूट करतेय. आता हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

@ShoneeKapoor नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जर मी काही बोललो तर वाद होईल.’ हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, कोणीतरी तिला कानाखाली मारली पाहिजे होती. दुसऱ्याने लिहिले की, ती का हसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, यातून तिच्यावर कुटुंबाने केलेले संस्कार दिसून येतात.