उत्तर प्रदेशमधील जालौन येथे नवीन घर बांधकाम सुरु असताना चांदीचा खजिना सापडला आहे. यामध्ये जवळपास १८०० सालातील जुनी नाणी सापडली आहेत. खोदकाम करताना नाणे सापडल्याची बातमी गावात समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. तर काहींनी या घटनेची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पुरातत्व विभागाचे अधिकारी पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नाणी ताब्यात घेतली. उत्खननात सापडलेली नाणी ही १५० वर्षे जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त आजतकने दिलं आहे

जालौन कोतवाली परिसरातील व्यासपुरा गावात राहणारे शेतकरी कमलेश कुशवाह हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधून घेत होते. घराचा पाया काढताना अचानक मजुरांना चांदीची नाणी सापडली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना समजल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खजिना असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. शिवाय या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जालौन कोतवाली पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या घराचा ताबा घेतला आणि घटनेची माहिती फॉरेन्सिक टीमसह पुरातत्व विभागाला दिली.

हेही पाहा- McDonald’s मध्ये बसलेल्या लहान मुलाच्या पॅंटमध्ये उंदीर शिरला अन्…, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

दरम्यान, जिल्हा प्रशासन या खजिन्याच्या शोध घेत आहेत. तर गावकऱ्यांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाने २५० चांदीची नाणी आणि ४ चांदीची कडी जप्त केली आहेत. रात्री उशिरा हे शोधकाम थांबवण्यात आलं असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळी पुरातत्व विभाग, महसूलचे पथक आल्यानंतर खजिन्याच्या शोध घेण्यासाठी पुन्हा खोदकाम काम सुरू करण्यात आलं.

हेही पाहा- चार वर्षाच्या चिमुरडीला बैलाने चिरडलं, हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचे CCTV फुटेज Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओराईचे उपजिल्हा अधिकारी राजेश सिंह यांनी सांगितले की, आम्हाला खोदकाम करताना नाणी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस पथकासह घटनास्थळी गेलो. ज्या घरात नाणी सापडली त्या घराचे बांधकाम सुरू होते, जे कमलेश कुशवाहा यांचे आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.