उत्तर प्रदेशातील महोबा येथे धक्कादायक घटना घडली आहे. म्हशीच्या शेणामुळे एका ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. पाळण्यामध्ये असलेल्या बाळाच्या तोंडावरच म्हशीने शेण टाकल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गुदमरून या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

श्वास गुदमरल्याने निष्पाप बालकाचा मृत्यू

एबीपी माझाच्या वृतानुसार, या घटनेबाबत मृताचे वडील मुकेश यादव यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी उशिरा त्याची पत्नी जनावरांना चारा देत होती. त्यानंतर सहा महिन्यांचा आयुष रडायला लागला, त्यानंतर आईने मुलाला पाळण्यात ठेवले आणि गोठ्याजवळ पाळणा ठेवून ती आपल्या कामात व्यस्त झाली. दरम्यान, बराच वेळ मुलाचा आवाज न आल्याने आईने त्याला हाक मारली, मात्र आवाज न आल्याने आई धावत मुलाकडे गेली असता मुलाचा चेहरा शेणाने झाकलेला दिसला. तिथे बांधलेल्या एका म्हशीने पाळण्यात टाकले शेण होते. निष्पाप बाळ पूर्णपणे शेणाखाली दबले गेले. आपल्या मुलाची अवस्था पाहून घाबरलेल्या आईने त्याल कुशीत घेतले आणि पतीला बोलावले. बाळाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी निष्पाप मुलाला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी शवविच्छेदन न करता निष्पाप मुलाचा मृतदेह घरी आणला.

डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
एबीपी माझाच्या वृतानुसार मुकेशने पुढे सांगितले की, “त्याच्या पत्नीचे लक्ष त्या बाळाकडे गेले तोपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. निष्पाप बाळाचा श्वास गुदमरल्याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, याबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही.

हेही वाचा – दिल्लीमधून बिहारला फिरायला गेली महिला, Airtel ने पाठवले १ लाखाचे इंटरनॅशनल रोमिंग बिल; सर्व्हिसदेखील केली बंद

कुटूंबावर कोसळले दुखाचे आभाळ
ही धक्कादायक घटना महोबा जिल्ह्यातील कोतवाली कुलपहाड परिसरातील सतारी गावात घडली आहे. ६ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने कुटूंबावर दुखाचे आभाळ कोसळले आहे. त्यांची पाळीव म्हैस त्यांच्या मुलाच्या मृत्यूचे कारण होईल हे याचा स्वप्नातही कुटुंबाने कधी विचार केला नसेल. जवळच बांधलेल्या म्हशींनी पाळणामध्ये ठेवलेल्या बाळाच्या तोंडावर शेण टाकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – रेल्वे प्लॅटफॉर्म सायकल उलटी पलटी करत केला जबरदस्त स्टंट, श्वास रोखून पाहत राहिले प्रवासी; Viral Video एकदा पाहाच