Snake Bites Russian dancer Viral Video : सध्याच्या इंटरनेटच्या जगात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी कंटेंट क्रिएटर्स काहीही करताना दिसतात. रिल बनवण्यासाठी तसेच एखाद्या फोटोसाठी वेगवेगळे स्टंट करताना बऱ्याचदा स्वतःचा जीव देखील धोक्यात घातला जातो. असाच एका रशियन डान्सरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही डान्सर एका भल्यामोठ्या सापाबरोबर फोटो काढताना, तसेच रिल बनवताना दिसत आहे. पण अचानक तो साप तिच्यावर हल्ला करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सापाबरोबर रील तयार करताना या रशियन डान्सर महिलेवर त्याने हल्ला केला. सापाने हल्ला केल्याचा हा धक्कादायक क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सापाने हल्ला केलेल्या रशियन महिलेचे नाव ‘शह्कडालेरा (shhkodalera) असे असून ती एक डान्सर आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती हातात साप घेतलेली दिसत आहे आणि याबरोबरच ती खोलीत आणखी कोणाशी तरी गप्पा मारत असताना दिसते. मात्र तिच्या हातातील साप अचानक तिच्यावर हल्ला करतो.

सुरुवातील ही महिला सापाबरोबर कॅमेऱ्यासमोर उभं राहुण पोज देत होती, पण अचानक या सापाने तिच्या नाकाचा चावा घेतला. अगदी काही सेंकदाच्या या क्लिपमध्ये दिसत आहे की ही महिला साप हतात घेऊन त्याचे चुंबन घेत असल्यासारखा चेहरा करत होती, पण साप तिच्या चेहऱ्याकडे येतो आणि वेगाने नाकाचा चावा घेतो. सापाने चावल्याने महिलेच्या नाकावर व्रणही पडले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सापाने चावा घेतल्यानंतर ही महिला सापाला खाली फेकून देते आणि नाक हातात पकडून भीतीने ओरडू लागते. या महिलेने नंतर दुसरी एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये ती आपल्या फॉलोअर्सना सापाने चावल्यानंतर तिच्या नाकावर पडलेले व्रण दाखवताना दिसत आहे. दरम्यान हा साप चावतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला असून याला ५० मिलीयनहून अधिक व्ह्यूजमिळाले आहेत. तर अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.