Mid day meal: देशात सर्वाधिका लाभार्थी असणारी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकार पुरुस्कृत योजना प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचं आणि उपस्थितीचं प्रमाण वाढावं तसंच गरीब कुटुंबातील मुलांना सकस आहार मिळावा या उद्देशाने देशभरात ही योजना राबवली जाते. पण अनेक ठिकाणी शालेय पोषण आहाराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याची अनेक धक्कादायक उदाहरणं समोर आली आहेत. सध्या असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील अररिया जिल्ह्यात मुलांच्या दुपारच्या जेवणात साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेवणात आढळला साप

प्राथमिक शाळेतील माधान्ह भोजनात मेलेला साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शाळेतील असंख्य विद्यार्थी आजारी पडले असून त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिहारमधील फारबिसगंज शहरात ही घटना घडली असून त्यानंतर आता स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. शाळेतील २४ मुलं आजारी पडले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अररियाचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि अन्न व औषध पुरवठा विभागातील अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पाहा फोटो

हेही वाचा – बिबट्यानं केला हल्ला मात्र वाघानं वाचवला जीव, थरारक Video पाहून व्हाल अवाक्

घाईगडबडीत सर्व मुलांना उपचारासाठी फारबिसगंजच्या उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake found in midday meal in bihars araria several students several students hospitalised srk
First published on: 27-05-2023 at 16:44 IST