Snake Found In Students Meal Viral News : पश्चिम बंगालच्या बीरभूम येथील मयुरेश्वर मंडळपूरच्या प्राथमिक शाळेत धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणात चक्क साप आढळल्याने सर्वांना धक्का बसला आहे. जवळपास ३० विद्यार्थ्यांना या जेवणाची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेबद्दल सामाजिक कार्यकर्ता राजेश दत्त यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. एका कंटेनरच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवण पार्सल पाठवण्यात आले होते. या कंटेनरमध्ये साप असल्याने विद्यार्थ्यांच्या जेवणात साप घुसल्याची सूत्रांची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या मयुरेश्वर येथील ३० विर्द्यार्थ्यांना या अन्नाची बाधा झाली आहे.

मसूर डाळीने भरलेल्या कंटेनरमध्ये साप आढळल्याचा दावा शाळेतील जेवण बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. साप आढळलेल्या जेवणाचं सेवन केल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीनं रामपुरहाट वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता राजेश दत्त यांनी ट्विटरवर या धक्कादायक घटनेची पोस्ट शेअर केलीय. या घटनेला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

नक्की वाचा – Video: भर लग्नमंडपात वऱ्हाड्यांसमोर नवरा लाजला, सनी लिओनीच्या गाण्यावर नवरीनं केलं असं काही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या गंभीर घटनेबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अन्नपदार्थांचं सेवन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची तक्रार दाखल केलीय. शालेय विभागातील जिल्हास्तरीय तपास अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एक विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना रग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालून त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली,”अशी माहिती ब्लॉक डेव्हलोपमेंट अधिकारी दिपंजन जाना यांनी दिलीय.