सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खळखळून हसवणारे असतात तर काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर डोळ्यात टचकन पाणी येतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाने वाढदिवशी दिलेलं सरप्राईज पाहून वडील भावूक झाले आणि ढसढसा रडू लागले. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

या व्हिडीओमधल्या वडिलांना त्यांच्या मुलाने असं काही सरप्राईज गिफ्ट दिलं की त्यांच्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं. आपली मुलं आणि कुटूंब हा अऩेकांसाठी वीक पॉइंट असतो. कामानिमित्त किंवा इतर काही कारणांसाठी कुटूंबापासून लांब राहणारी मुलं जेव्हा अचनाक आपल्या आई-वडिलांना भेटतात, तेव्हा त्यांना आभाळ ठेंगणं झाल्याचे अनुभव आल्याचं आपण अऩेकदा पाहतो. असाच अनुभव नुकताच एका वडिलांना आला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा टेबलाकडे चालताना दिसत आहे. जिथे त्याचे वडील कुटुंबासह बसले आहेत. दुसरा माणूस वडिलांचे डोळे झाकून उभा असलेला दिसतो. मुलगा वडिलांसमोर येताच त्या व्यक्तीने वडिलांच्या नजरेतून हात काढून घेतला. यानंतर वडील आपल्या मुलाला पाहून रडायला लागतात आणि त्याला जोरात मिठी मारतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, त्या व्यक्तीने त्याच्या वाढदिवसाला कॅनडाहून येऊन वडिलांना आश्चर्यचकित केले होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वर्गातच दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आणखी वाचा : रस्ता ओलांडणाऱ्या हत्तीला बाईकस्वार जवळजवळ धडकणारच होता…. पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख १६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे आठ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओल लाईक केलंय. लोक हा व्हिडीओ पाहून भावूक होत वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करू लागले आहेत.